वरणगावमध्ये शिवसेना सदस्य नोंदणीला प्रतिसाद
‘घर घर शिवसैनिक’ पंधरवड्याचा शुभारंभ : आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट देत वाढवला उत्साह
वरणगाव : वरणगाव शिवसेनेतर्फे 1 ते 15 फेब्रुवारीपर्यंत ‘घर घर शिवसैनिक’ पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी 195 शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी होऊन उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे. यामध्ये पुरुषासह महिलांचादेखील नोंदणीत सहभाग आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मंगळवार, 1 फेब्रुवारी रोजी सकाळी बस स्टॅन्ड चौकात शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. आमदार चंद्रकांत पाटील यांनीदेखील नोंदणीप्रसंगी भेट दिली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी कार्यालयीन जिल्हा उपप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, उपजिल्हा संघटक विलास मुळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, मुस्लिम समाजाचे नेते हिप्पी शेठ, उप तालुकाप्रमुख सुभाष चौधरी, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, अल्पसंख्यांक संघटक सईद मुल्लाजी, उपशहर प्रमुख राम शेटे, अशोक शर्मा, सुखदेव धनगर, असरोद्दीन शकीरोद्दीन, माजी शहर प्रमुख संजय वंजारी, नीळकंठ सरोदे, मोहमद वकील, अबू सुफियान, मुस्तफा शहा, तारझन देवघघाटोळे, आबा सोनार, सागर वंजारी, पंकज पाटील, पंकज चौधरी, शिवा भोई, शकील शाह, राहुल वंजारी, सागर पोळ, गोविंदा चौधरी, योगीता सोनार, जयश्री महाजन, स्वप्नील महाजन, विलास वंजारी, अरबाज पहेलवान, मुद्दसर शेख, किरण माळी, वैभव लोखंडे यांच्यासह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
पंधरा दिवस चालणार सदस्य नोंदणी
पाच दिवस बस स्टॅन्ड चौकात, पाच दिवस नदी पात्र आणि पाच दिवस गांधी चौकात अशा पद्धतीने पंधरा दिवस शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. या सदस्य नोंदणी अभियानात वरणगावातील नागरिकांनी सहभागी होऊन नोंदणी करावी असे आवाहन शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर यांच्यासह पदाधिकार्यांनी केले आहे.


