ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन
मुंबई : दिग्गज अभिनेते रमेश देव यांचं आज निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. नुकतंच ३० जानेवारी रोजी त्यांनी आपल्या वयाची ९६ वर्षे पूर्ण केली होती. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या चित्रपटसृष्टीला समर्पित केलं होतं. रमेश देव यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.
