वरणगावात भाजपातर्फे विकास आघाडीविरुद्ध आंदोलन


वरणगाव : भारतीय जनता पार्टी वरणगाव शहरातर्फे बुधवारी बसस्थानक चौकात महाविकास आघाडीने घेतलेल्या किराणा दुकानावर वाईन विक्रीच्या निणर्याच्या निषेधार्थ अन्य मागण्यांबाबत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. प्रसंगी महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या मागण्यांसाठी आंदोलन
शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कापू नये, जळालेल्या डीपी तातडीने बसवाव्यात, यावल अत्याचार प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, वरणगाव शहर व परीसरातील अवैध धंदे बंद करावेत, वरणगाव नगरपरीषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेच्या कामाला जलदगतीने सुरुवात करावी तसेच शहरात भूमिगत गटारींचा प्रस्ताव मंजूर करावा यासह तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराचे काम व भोगावती नदीचे काम सुरू करावे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.

यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसुफ, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, भाजपचे शहराध्यक्ष सुनील माळी, मिलिंद भैसे, डॉ .सादीक साबीर कुरेशी, महिला आघाडी अध्यक्षा प्रणिता चौधरी-पाटील, रुख्मिणी काळे, मंदा थटार, कस्तुराबाई इंगळे, भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष किरण वंजारी, शहराध्यक्ष आकाश निमकर, पप्पू ठाकरे, हितेश चौधरी, गोलू राणे, नटराज चौधरी, अनिल वंजारी, रमेश पालवे, डॉ.प्रवीण चांदणे, नाना चौधरी, योगेश माळी, माजी सरपंच सुभाष धनगर, कृष्णा माळी, संदीप माळी, इरफान पिंजारी, रॉक्स कश्यप, गजानन वंजारी, जीवराम पाटील, वसीम शेख, शोयब शेख निजाम शेख, महेश माळी, सुला झोपे, मुस्लिम अन्सारी, जैस्वाल बापूजी, दादू पालवे, गंभीर माळी, रमेश बैरागी शाहरुख शेख, आवेस शेख, बळीराम सोनवणे, के.के.आंभोरे, बाळा धनगर आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !