भुसावळ तालुक्यात विनयभंगानंतर अल्पवयीन मुलीची आत्महत्या : आरोपीला अटक
भुसावळ : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्यानंतर पीडीतेने आत्महत्या केल्याची घटना 1 रोजी दुपारी आत्महत्या केली होती. या प्रकरणी संशयीत आरोपी युवराज उर्फ गोलू रवींद्र नेहते (23) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आला.
विनयभंगानंतर पीडीतेची आत्महत्या
भुसावळ तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयीत आरोपी युवराज नेहते याने अनधिकृतपणे घरात शिरून विनयभंग केला होता. या घटनेचा पीडीतेवर मोठा मानसिक आघात झाल्याने तिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली होती. 1 रोजी 10.45 ते दुपारी दिड वाजेच्यादरम्यान ही घटना घडली होती. या प्रकरणी सुरूवातीला तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी पिडीतेच्या पाल्यांनी भुसावळ तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात बुधवारी पोक्सो व विविध कलमान्वये गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.


