लाचखोर पोलिस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात
कोल्हापूर : दीड हजारांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने शहापूर (तालुका हातकणंगले) येथील पोलीस कॉन्स्टेबलला अटक केल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली. जगदीश संकपाळ (यड्राव, ता.शिरोळ) असे अटकेतील कर्मचार्याचे नाव असून लाचेची मागणी करणारा पोलिस हवालदार आसीफ शिराजभाई हा पसार झाला आहे.
एसीबीच्या सापळ्यात अडकला पोलिस कर्मचारी
तक्रारदार यांच्या आत्याचे नावे न्यायालयाकडून वॉरंट निघाले होते. याप्रकरणी अटकेची कारवाई टाळण्याकरिता शहापूर पोलिस ठाण्याचे हवालदार आसीफ नसिरुद्दीन सिराजभाई आणि जगदीश भूपाल संकपाळ या दोघांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यातक्रारीनुसार या दोघांवर सापळा रचण्यात आला. दरम्यान यात तडजोडीअंती दीड हजार रुपये स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पोलीस पाटील जगदीश संकपाळ याला रंगेहाथ पकडले तर पोलिस हवालदार आसिफ शिराजभाई पसार असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

