गॅस कटरने एटीएम फोडत 19 लाखांची रोकड लंपास


अहमदनगर : स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने फोडत चोरट्यांनी 19 लाख रुपयांची रक्कम लांबवली. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावरील घारगाव गावाच्या शिवारात घडली.

सीसीटीव्हीवर मारला स्प्रे
नशिक-पुणे महामार्गालगत तालुक्यातील घारगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएमला लक्ष्य करत गॅस कटरच्या साहाय्याने फोडले. सीसीटिव्ही कॅमेर्‍यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारत डीव्हीआर लंपास केला. एटीएममधून सुमारे 19 लाख रुपयांची रक्कम चोरीला गेली असल्याचे बँकेच्या शाखेचे शाखाधिकारी कांचन दाभाने यांनी सांगितले.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
घटनास्थळी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष फड आदींनी धाव घेतली. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्याचे काम सुरू असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !