अनैतिक संबंधाच्या संशयातून धुळ्यात तरुणाचा खून
धुळे : धुळे शहरातील मिल परीसरात शुक्रवारी सायंकाळी निखील पाटील (21) (Nikhil Patil) या तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून धुळे शहर पोलिसांनी (Dhule City Police) या प्रकरणी खुनाचा दाखल करीत तिघांना ताब्यात घेतल्याचे खळबळ उडाली आहे.
संशयाने घेतले तरुणाचे प्राण
संशयीत आरोपी मयूद शार्दुलला आपल्या पत्नीचे निखील पाटील या तरुणासोबत संबंध असल्याचा संशय होता व त्यातून त्याने आपल्या दोघा भावांच्या मदतीने निखील याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याने निखीलचा मृत्यू ओढवला होता. धुळे शहर पोलिसांनी (Dhule City Police) मयूर शार्दुल (Mayur Shardul) व त्याच्या दोघं भावाना अटक केली असून आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक नितीन देशमुख (pi nitin deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


