रेशनचे धान्य द्या अन्यथा भाजयुमो करणार आंदोलन
वरणगाव : शहरातील गरीब मजूर लोकांना दोन महिन्यांपासून रेशनचे धान्य मिळाले नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. धान्याअभावी वरणगाव शहरातील नागरीकांचे हाल होत असून नागरीकांना त्वरीत धान्य वितरीत करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष आकाश निमकर, उपाध्यक्ष पप्पू धनगर, उपाध्यक्ष रॉक्स कश्यप, चेतन ठोंबरे, गोलू वंजारी, अंकुश साबळे, सुला झोपे, अतुल राणे, बंटी सुतार, लखन माळी, बबलू शेख, पिंकेश घाटोळे, महेश माळी यांनी निवेदनाद्वारे जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
अधिकार्यांना निवेदन सादर
निवेदनाच्या प्रति विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत, पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार दीपक धीवरे व प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना देण्यात आली आहे.


