भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात 57 दात्यांनी केले रक्तदान
भुसावळ : शहरातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे बुधवार, 9 रोजी महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागात रक्तदान शिबिर झाले. या शिबिरात 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि माजी विद्यार्थी संघटनेचे सल्लागार डॉ.मोहन फालक यांच्याहस्ते करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही. पाटील, डॉ.बी.एच.बर्हाटे, डॉ.ए.डी.गोस्वामी, डॉ.एन.ई.भंगाळे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील, शिबिर समन्वयक आणि माजी विद्यार्थी संघटनेचे कोषाध्यक्ष प्रा.हर्षल पाटील उपस्थित होते. या शिबिरासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगांवच्या पीआरओ रोहिणी काळे, डॉ.सोनवणे आणि संपूर्ण टीमचे सहकार्य लाभले. या शिबिरात एकूण 57 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी,माजी विद्यार्थी आणि भुसावळ शहरातील नागरीक यात राजीव शर्मा, महिमा शर्मा यांचा सहभाग होता. यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा.डॉ.जी.आर.वाणी, संचालक प्रा.दीपक पाटील, प्रा.चंद्रकांत सरोदे, प्रा.डॉ.गौरी पाटील, आशिष चौधरी, प्रा.स्मिता बेंडाळे, प्रा.स्वाती शेळके, प्रा.डॉ.सचिन येवले, प्रा.डॉ.उमेश फेगडे, प्रा.डॉ.सचिन कोलते, प्रा.डॉ.विलास महिरे, संगणक विभागातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.


