अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन
भुसावळ : शहरातील अष्टभूजा देवी मंदिराजवळील अथर्व दुकानासमोर 65 ते 70 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह 5 रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास आढळला होता. या प्रकरणी श्रावण रमेश देवरे (रमाबाई आंबेडकर नगर, भुसावळ) यांच्या खबरीनुसार भुसावळ बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मयत हा बेवारस असल्याने त्याच्या वारसांबाबत माहिती असल्यास वा ओळख पटत असल्यास भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याशी 02582-222399 वा तपासी अंमलदार हवालदार राजेश पाटील (9923139717) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.


