शहाद्यात बनावट नोटा बाळगणारा पोलिसांच्या जाळ्यात


शहादा : शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ अकरा हजार शंभर रुपयाच्या बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा शहरातील (shahada city) गरीब नवाज कॉलनीत राहणार्‍या नाजीम रहिम बागवान (32) (Najim Rahim Bagwan) हा सोन्याच्या दुकानात गहाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्याला पकडून तपासणी केली असता त्याच्या ताब्यात शंभर रुपयाच्या 111 बनावट नोटा मिळून एकूण अकरा हजार शंभर रुपयाच्या बनावट नोटा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

पोलिसात गुन्हा दाखल
या प्रकरणी विकास कापुरे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिस ठाण्यात (Shahada Police Station) नाजीम रहिम बागवान (गरीब नवाज, शहादा) याच्याविरुद्ध भादवि कलम 489 ( ब ) 489 ( क ) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत (pi dipak budhwant) करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !