संतापजनक ! : भाच्यावर जडले मामीचे प्रेम : अडथळा ठरणार्या पतीचा काढला काटा
नवी दिल्ली : मामीच्या प्रेमात वेड्या झालेल्या भाच्याने मामीला मिळवण्यासाठी मामाचा खून केला. पोलिसांनी मात्र या गुन्ह्याची उकल केली आहे. बिहारची राजधानी पटना येथे ही घटना घडली. मंगळवारी शिर कापलेला मृतदेह आढळून आल्यानंतर ब्लाइंड केसमध्ये पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला.
अनैतिक संबंधाला विरोधाने केली हत्या
मृतकाची ओळख नोहटा गावातील सूरज कुमारच्या रूपात झाली आहे. तो फतुहा रेल्वे यार्डात मजुरीचं काम करत होता. पोलिसांनुसार, पत्नीच्या अनैतिक संबंधाना विरोध केल्याने त्याची गळा कापून हत्या करण्यात आली होती. सूरज कुमारची हत्या त्याची पत्नी आणि सख्ख्या भाच्याने मिळून केली. सूरजच्या पत्नीचे सख्ख्या भाच्यासोबत अनैतिक संबंध होते आणि सूरजने याचा विरोध केला होता. सूरजचा विरोध त्याची पत्नी काजल कुमारी आणि भाचा आकाश कुमार याला आवडला नाही. दोघांनी काही मित्रांसोबत मिळून सूरजची धारदार हत्याराने हत्या केली. नंतर मृतदेह फेकून दिला.




आरोपींनी गुन्हा केला कबुल
पोलिसांनी सांगितलं की, हत्याकांडात वापरलेला सूरा ताब्यात घेण्यात आला आहे. तेच अटक करण्यात आलेल्या मृतकाच्या पत्नीने आणि भाच्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. डीएसपी राजेश कुमार मांझी यांनी सांगितलं की, मृतक सूरज कुमारची पत्नी काजल कुमारीचं पतीच्या भाच्यासोबत म्हणजे आकाश कुमारसोबत अनैतिक संबंध होते. त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. डीएसपींनी सांगितलं की सूरजने या अनैतिक संबंधाला विरोध केला होता. त्यामुळे त्याला मार्गातून हटवण्यासाठी काजल कुमारी आणि आकाश कुमारने मिळून आपला मित्र अजीतसोबत हत्येचा प्लान केला. या प्लाननुसार सूरजला बागेत बोलवून दारू पाजण्यात आली आणि नंतर नशेत त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितलंकी, गेल्या मंगळवारी एक शिर कापलेल्या तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी 24 तासांच्या आतच केस सॉल्व्ह केली.