हिंगणघाट जळीत कांड : आरोपी विकेश नगराळेला मरेपर्यंत जन्मठेप


हिंगणघाट : हिंगणघाट (Hinganghat) येथील अंकिता पिसुड्डे (Ankita Pisudde) या प्राध्यापक युवतीला जाळून मारल्याप्रकरणी आरोपी विकेश ऊर्फ विक्की ज्ञानेश्वर नगराळे (27) (Vikesh Nagrale) यास न्यायालयाने गुरुवारी खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

एकतर्फी प्रेमातून प्राध्यापक तरुणीला जाळले
दारोडा येथील रहिवासी अंकिता पिसुड्डे (Ankita Pisudde) ही हिंगणघाट (Hinganghat)  येथील एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होती. सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 रोजी दारोडा येथून हिंगणघाट येथे आल्यावर महाविद्यालयाकडे जात असताना नंदोरी चौकात तिच्यावर आक्रीत ओढवले. दारोडा येथील रहिवासी विकेश नगराळे (Vikesh Nagrale) या माथेफिरू तरुणाने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. यात ती गंभीररीत्या जळाली. नागपूर येथील खाजगी रुग्णालयात तिच्यावर शर्थीचे उपचार सुरू होते मात्र 10 फेब्रुवारी 2020 रोजी अंकिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, अंकिताच्या (Ankita Pisudde) मृत्यूला 10 फेब्रुवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कार्यालयीन कामकाजाच्या केवळ 19 दिवसांतच 426 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयातही या प्रकरणात 64 सुनावण्या घेत 29 साक्षीदारांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवले होते.

निकालावर समाधानी नाही
न्यायालयाने निकाल दिला असला तरी आम्ही यावर समाधानी नसल्याचे पीडितेच्या कुटुंबियांची म्हणत या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा होेणे अपेक्षित होते, असे म्हटले आहे. या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या विकेशला (Vikesh Nagrale) फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी होत होती. या प्रकरणी 426 पानांचं दोषारोपपत्र, 64 सुनावणी, 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे, पीडित तरुणीच्या मृत्यूला दोन वर्ष पूर्ण होताना बुधवारी हा निकाल दिला जाणार होता परंतु आता दोषी विकेशच्या शिक्षेवर गुरुवारी सुनावणी पार पडली. दरम्यान, या जळीतकांड प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरकारनं विशेष सरकारी वकिल म्हणून अ‍ॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !