महावितरण कंपनीचे लाचखोर उपकार्यकारी एसीबीच्या जाळ्यात
पुणे : महावितरण कंपनीच्या उरुळी कांचन उपविभागातील उप कार्यकारी अभियंत्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली. इलेक्ट्रिक ठेकेदाराकडून ग्राहकांचे ओपन प्लॉटमध्ये ट्रांसफार्मर कनेक्शन घेण्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करुन ते पुढील कार्यालयास पाठवण्यासाठी आरोपीने 20 हजारांची लाच घेतल्याने सापळा रचून गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. प्रदीप वासुदेव सुरवसे (Pradeep Vasudev Suravase) (48) असे लाचखोर आरोपीचे नाव आहे.
पुणे एसीबीने केला सापळा यशस्वी
तक्रारदार हे इलेक्ट्रिक ठेकेदार (Electric contractor) असून त्यांच्याकडील ग्राहकांचे ओपन प्लॉटमध्ये ट्रान्सफार्मर कनेक्शन घेण्यासाठी अंदाजपत्रक तयार करुन ते पुढील कार्यालयास पाठवायचे होते. यासाठी प्रदीप सुरवसे याने तक्रारदार यांच्याकडे 25 हाजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केल्यानंतर पथकाने पडताळणी केली.
त्यावेळी प्रदीप सुरवसे याने तक्रारदार यांच्याकाडे 20 हजार लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने सापळा रचून प्रदीप सुरवसे याला तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले. आरोपी प्रदीप सुरवसे याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशस्वी केला.
