जळगाव जामोद, रावेर, वरणगाव, स्वराज्य इलेव्हन विजयी
भुसावळातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा : 13 रोजी होणार अंतिम सामना
भुसावळ : अनिकेत पाटील मित्र परीवार व अप्फान क्रिकेट क्लब आयोजित स्व.निखील खडसे स्मृती चषक क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या दुसर्या दिवशी झालेल्या सामन्यात जळगाव जामोद, रावेर, वरणगाव स्वराज इलेव्हन या संघांनी सामने जिंकले.
दुसर्या दिवसातील सामने व निकाल असा
जळगाव जामोदविरुद्ध श्रीसीसी या सामन्यात जळगाव जामोद संघाने चार गड्यांनी विजय मिळविला.
शम्मी- 11 भुसावळ विरुद्ध इंडियन रावेर या सामन्यात इंडियन रावेर संघाने दहा गड्यांनी विजय मिळविला.
आदनान सीसी फैजपूरविरुद्ध पार्थ मोटार, वरणगाव या सामन्यात पार्थ मोटर, वरणगाव संघाने 9 गडी राखून विजय मिळविला. तन्वी- 11 साकेगाव विरुद्ध स्वराज- 11 जळगाव या सामन्यात स्वराज- 11 ने 8 गडी राखून विजय मिळवला.
श्रीसीसी जळगाव विरुद्ध स्वराज 11 जळगाव या सामन्यात स्वराज्य 11 जळगाव या संघाने 8 गडी राखून विजय मिळविला.
शुक्रवारचे सामने व निकाल असा
स्पर्धेचा तिसरा दिवस अत्यंत रोमहर्षक राहिला प्रत्येक सामना अटीतटीचा झाला. पहिला सामना रेल्वे बॉईजविरुद्ध बच्चा सीसी यांच्यात झाला. हा सामना बच्चे संघाने 36 जिंकला धावांनी जिंकला.
भुसावल युनायटेड सीसीविरुद्ध महाराष्ट्र लाइव्ह या सामन्यात महाराष्ट्र लाईव्ह संघाने 8 गडी राखून विजय मिळवला. जोहानविरुद्ध जयहिंद सीसी या सामन्यात जयहिंद संघाने सात गड्यांनी विजय मिळवला. फैजान सीसीविरुद्ध इलेव्हन-2 या सामन्यात तनवी इलेव्हन संघाने 6 गडी राखून विजय मिळवला. बच्चाविरुद्ध जयहिंद सीसी या सामन्यात जय हिंद संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. महाराष्ट्र लाईनविरुद्ध तन्वी इलेव्हन- 2 या सामन्यात तन्वी- 11 संघाने सात गडी राखून विजय मिळवला. जयहिंद सीसीविरुद्ध तन्वी- 11 या सामन्यात तन्वी इलेव्हन या संघाने 22 धावांनी विजय मिळविला.
यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
स्पर्धा यशस्वीतेसाठी अनिकेत पाटील मित्र परीवार ग्रुपचे सदस्य प्रा.सुनील नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेत आहेत. स्पर्धेत ग्राउंड कमिटीचे काम अर्षद सैय्यद, कॉमेंटेटर रमजान पटेल, फकरुद्दीन, पंच साकीत तारे, भूषण निकम, नासिर तर स्कोरर म्हणून अब्रार, असलम शेख हे काम बघत आहे.


