कांडवेल शेतशिवारात बिबट्याने पाडला दोन बकरींचा फडशा


रावेर : तालुक्यातील कांडवेल शेती शिवारात बिबट्याने दोन बकर्‍या फस्त केल्याची घटना शनिवारी उघडकीस आल्याने पशूपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत. कांडवेल शेती-शिवारात बिबट्याने दोन बकर्‍या फस्त केल्या केल्या असून हा प्रकार उघउकीस आल्यानंतर कांडवेल परीसरातील शेतकरी व नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती वनपाल अतुल तायडे यांना समजताच ते आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. पगमार्ग पाहिल्यानंतर हल्ला करणारा प्राणी बिबट्या असल्याचे निष्पन्न झाले. वनपाल अतुल तायडे यांनी नागरीकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या असून बिबट्यासाठी या परीसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !