भुसावळात निबंध स्पर्धेतील विजेत्यांच्या पाठीवर पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे वाढदिवसानिमित्त कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांनी आयोजित केल्या निबंध स्पर्धा
भुसावळ : भुसावळातील कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांनी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध स्पर्धा घेतल्या होत्या. या सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना भुसावळातील विकासकामांचे उद्घाटनानिमित्त आलेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते शनिवारी गौरवण्यात आले. यावेळी विजेत्यांचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच आयोजकांचे कौतुक केले.
सत्काराने विजेते भारावले
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते निबंध स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह व चांदीचा शिक्का देवून गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शिवभोजन संचालक तथा कट्टर शिवसैनिक उमाकांत (नमा) शर्मा यांनी केले. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक अनिकेत सपकाळे तर द्वितीय पूर्वा चौधरी तसेच तृतीय क्रमांक ईशा पाटील यांनी पटकावला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, प्रा.उत्तमराव सुरवाडे, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, तालुका संघटक संतोष सोनवणे व मिलिंद कापडे, जवाहर गौर, पवन मेहरा इत्यादी उपस्थित होते.


