भुसावळात आज क्रिकेट स्पर्धेचा समारोप : सिनेअभिनेत्री श्रावणी गोस्वामींची राहणार प्रमुख उपस्थिती


भुसावळ : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सुरू असलेल्या स्व.निखील खडसे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचा रविवार, 13 रोजी समारोप होत असून या समारंभात विजयी संघाना पारीतोषिक वितरण केले जाईल. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे व सिने अभिनेत्री श्रावणी गोस्वामी (मुंबई) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

यांची राहणार प्रमुख उपस्थिती
शहरातील अनिकेत पाटील मित्र परीवार व अफ्फान क्रिकेट क्लबतर्फे 9 फेब्रुवारीपासून स्व.निखील खडसे स्मृती चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे पारीतोषिक वितरण दुपारी चार वाजता होणार आहे. यावेळी अभिनेत्री श्रावणी गोस्वामी यांची प्रमुख उपस्थिती असेल तसेच फिल्म डायरेक्टर व निर्माते मानव सोहेल हे मुख्य आकर्षण राहणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, जिल्हा बँकेच्या संचालक रोहिणी खडसे- खेवलकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सुनील नेवे, तहसीलदार दीपक धीवरे, शहरचे गजानन पडघण, बाजारपेठचे राहुल गायकवाड, डीआरएम एस.एस.केडीया, आयुध निर्माणीचे वसंत निमजे, भोर लेवा पंचायतीचे रमेश पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी आदींसह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी उपस्थितीचे आवाहन आयोजक अनिकेत पाटील यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !