शिवजयंतीनिमित्त शिवदर्शन सप्ताह ऑनलाईन व्याख्यानमाला
भुसावळ : छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त शिवदर्शन सप्ताह ऑनलाईन व्याख्यानमालेचे 14 ते 21 फेब्रुवारी 2022 दरम्यान दररोज सायंकाळी 6 वाजता होणार आहे. उद्घाटन डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, जि. प. सदस्य रवींद्र नाना पाटील, डायटचे अधिव्याख्याता शैलेश पाटील यांच्याहस्ते होणार आहे. शिवजयंती घराघरात साजरी करतांना शिवचरीत्र सांगता सांगता त्यांचा वैचारीक वसा समाजमनामध्ये रुजावा व जोपासला जावा या उद्देशाने महाराष्ट्रातील विद्वान व्याख्याते शिवचरित्राचे नानाविध पैलू उलगडून दाखविणार आहेत. डॉ.जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
यांचे होणार व्याख्यान
सोमवार, 14 रोजी प्रा.डॉ.गजानन महाराज वाव्हळ (पुणे) यांचे तुकोबाराय आणि शिवराय या विषयावर व्याख्यान होईल. मंगळवार, 15 रोजी युवा शिवशाहीर अक्षय डोंगरे (नगर) यांचा शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम होईल. बुधवार, 16 रोजी शिवव्याख्याते रामेश्वर भदाणे (जळगाव) यांचे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ समजून घेताना या विषयावर व्याख्यान होईल. गुरुवार, 17 रोजी शिवचरित्रकार चंदन पवार (जळगाव) यांचे शिवरायांची युद्धनिती या विषयावर व्याख्यान होईल. शुक्रवार, 18 रोजी हभप गंगाधर महाराज कुरुंदकर (हिंगोली) यांचे शिवरायांचा महिलाविषयक दृष्टिकोन या विषयावर व्याख्यान होईल. शनिवार, 19 रोजी डॉ.स्वप्नील छाया विलास चौधरी (औरंगाबाद) यांचे शिवछत्रपतींचा विचार हिच काळाची गरज या विषयावर व्याख्यान होईल. रविवार, 20 रोजी शिवचरीत्रकार प्रेमचंद अहिरराव (धुळे) यांचे स्वराज्याचा राज्यकारभार : लोकशाहीचा आधार या विषयावर व्याख्यान होईल. समारोपीय व्याख्यान सोमवार, 21 रोजी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे होणार आहे. स्वराज्य आणि धर्म या विषयावर ते श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. व्याख्यानमाला ऑनलाईन असल्याने तात्काळ लिंक मागवण्यासाठी डी.के.पाटील (9403731368) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे संजीव पाटील यांनी केले आहे.


