जळगावच्या पिंप्राळा बाजारातून दुचाकी लंपास


जळगाव : शहरातील पिंप्राळा बाजार पट्ट्यातून एकाची 12 हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकींच्या चोर्‍या वाढल्या
रामदास सुकदेव धनगर (41, रा.वाटीकाश्रम पाठीमागे, जळगाव) हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. पिंप्राळा येथील बुधवारचा बाजार असल्याने 9 फेब्रुवारी रोजी रामदास धनगर हे मोटारसायकल (एम.एच.19 बी.एस.2062) ने सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आल्यानंतर पिंप्राळ्यातील सिध्दीविनायक मंदीराजवळ त्यांची दुचाकी पार्क केली मात्र सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही. शनिवारी दुपारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार नाना शिरसाठ करीत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !