लॅपटॉपसह मोबाईल लांबवला : मुक्ताईनगरातील घटना


मुक्ताईनगर : शहरातील ‘झांबरे वाडा’ येथे अज्ञात चोरट्यांनी महागडा लॅपटॉप आणि मोबाईल लांबवला. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
कर्तव्य बाळू टाकरखेडा (18, रा.झांबरे वाडा, मुक्ताईनगर) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी त्याच्या घरात ठेवलेला 30 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप आणि पाच हजाराचा मोबाईल चोरून नेल्याची घटना पहाटे 6.30 ते 8.30 वाजेच्या दरम्यान उघडकीला आली. याबाबत कर्तव्य टाकरखेडा याने मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार शैलेश चव्हाण हे करीत आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !