वाईन विक्रीचा तुघलकी निर्णय तत्काळ रद्द करावा
भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकार्यांनी पाठविले महिला आयोगास शेकडो पत्रे
भुसावळ : महाविकास आघाडी शासनाने किराणा दुकाने व मॉलमध्ये वाईन विक्रीस परवानगी देण्याचा आदेश त्वरीत रद्द करावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना 14 रोजी शेकडो पत्रे पाठवली. राज्य सरकारद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या या निर्णयामुळे किराणा दुकाने व मॉलमधून सर्रास वाईन विक्री करण्यात येणार असल्याने महाराष्ट्र राज्य मद्यराष्ट्र बनविण्याचा हा संतापजनक प्रकार असून यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन लाखो संसार हे उघड्यावर येतील त्याच प्रमाणे तरुण पिढी बरबाद करण्याचे हे कारस्थान थांबवावे, अशा संतप्त भावना महिला पदाधिकार्यांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केल्या.
तर तीव्र आंदोलनाचा इशारा
वाईन विक्रीचा निर्णय रद्द न केल्यास येत्या काही दिवसात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा भुसावळ शहरतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रजनी सावकारे, महिला मोर्चा शहराध्यक्षा जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील,अनिता आंबेकर, माजी नगरसेविका मीना लोणारी, भारती वैष्णव यांनी दिला.
यांची होती उपस्थिती
राज्य महिला आयोगाला पत्रे रवाना करण्यासाठी शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या मंगला वाणी, पुष्पा बाणाईत, योगीता कासार, पौर्णिमा आंबेकर, विजया गुंजाळ, वैशाली भदाने, श्रद्धा चौधरी, आशा दरगड, पद्मजा दरगड, संगीता तायडे, लिना टेकाळे, मीनाक्षी पिंपळे आदी महिलांची व त्यासोबतच भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, युवा मोर्चाचे अनिरुद्ध कुलकर्णी, प्रा.विलास अवचार, दिलीप कोळी, व्यापारी आघाडीचे अनिल रोहडा, दिनेश दुधानी, गोपीसिंग राजपूत इत्यादी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


