जळगावच्या कोल्हे हिल्स परीसरात तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळला
जळगाव : वाघ नगर परीसरातील कोल्हे हिल्स (kolhe hills) परीसरात एका अनोळखी तरूणाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.
आत्महत्या केल्याचा अंदाज
वाघ नगर (jalgaon wagh nagar) परीसरातील कोल्हे हिल्स (jalgaon kolhe hills) परीसरात मंगळवार, 15 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास अंदाजे 25 वर्षीय तरुणाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने परीसरात खळबळ उडाली. मयत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. मयत तरुणाने आत्महत्या केली असावी? असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमागे आणखी काही वेगळे कारण आहे का याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह रात्री 11 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास निरीक्षक रामकृष्ण कुंभार (pi ramkrishna kumbhar) यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिल फेगडे हे करीत आहे.





