चाकूने वार करून तरुणाच्या हातातील मोबाईल लंपास


जळगाव : तरुणावर अज्ञात दोन जणांनी चाकूने वार करून जखमी करत हातातील मोबाईल (mobile) लांबवला. मानराज पार्कजवळ ही घटना घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात (jilha pet police station) गुन्हा दाखल करण्यात आला. अविनाश राजेंद्र सोनवणे (24, रा.बांभोरी, ता.धरणगाव, जि.जळगाव) (avinash rajendra sonawane) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू
अविनाश सोनवणे (avinash sonawane) हा आपल्या कुटुंबियासह बांभोरी (bambhori) येथे वास्तव्याला आहे. शहरातील मानराज पार्क (manraj park) समोरील नवजीवन शुपर शॉपच्या बाजूला राहणारे सुशील साळुंखे यांच्याकडे वाहन चालक म्हणून नोकरीला आहे. सोमवार, 14 फेब्रुवारी रोजी अनिवाश दिवसभर ट्रीप करून सायंकाळी मालकाकडे रात्री 10.30 वाहन लावले आणि घरी जाण्यासाठी पायी निघाले. त्यावेळी मानराज पार्कजवळील दिलासा व्यसनमुक्ती केंद्रासमोरून मोबाईलवर बोलत पायी जात असतांना त्यांच्या मागून अज्ञात दोनजण दुचाकीने आले. हातातील मोबाईल अज्ञात चोरट्यांनी हिसकावल्याने अविनाश यांनी मागे बसलेल्या तरूणाला लागलीच पकडले. यातील एकाने चाकू काढून अविनाश यांच्यावर वार करून जखमी केले व दोघे दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात (jilha pet police station) गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख (psi ganesh deshmukh) करीत आहे.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !