बी.जे.मार्केटमध्ये चोरट्यांनी दोन दुकाने फोडत 60 हजारांची रोकड लांबवली
जळगाव : चोरट्यांनी शहरातील बी.जे. मार्केटमधील दोन दुकाने फोडून सुमारे 60 हजारांची रोकड लांबवल्याने व्यापार्यांमध्ये भीती पसरली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोर्या वाढल्याने व्यापार्यांमध्ये घबराट
राजेंद्र मधुकर कुलकर्णी (रा.मुंदडा नगर, रामानंद नगर, जळगाव) यांचे शहरातील बी.जे.मार्केटमध्ये श्री प्लायवूड सेंटर दुकान असून सोमवार, 14 फेब्रुवारी रोजी त्यांनी रात्री आठ वाजता दुकान बंद केले व मंगळवार, 15 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता दुकानात चोरी झाल्याचे उघड झाले. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील 45 हजारांची रोकड लांबवली तसेच याच मार्केटमधील सोपान रंगराव सुर्वे यांच्या श्रीराम कॉस्मेटिक दुकानातून चोरट्यांनी 15 हजार पाचशे रुपयांची रोकड लांबवली. याबाबत राजेंद्र कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक गणेश पाटील करीत आहेत.





