वरीष्ठ पोलिस अधिकार्यांसह न्याय पालिकेतील वरीष्ठांच्या नावाने खंडणी उकळली : हवाला व्यावसायीकासह तिघे जाळ्यात
नागपूर : नागपूरातील खंडणी प्रकरणात चाळीसगावातील संशयीतास दोन हवाला व्यावसायीकांना अटअक करण्यात आली आहे. संतोष मानधनिया (चाळीसगाव) तसेच हवाला व्यावसायीक नरेश परमार आणि रतन राणा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. वरीष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायपालिकेतील वरीष्ठांच्या नावाने सुपारी व्यापार्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, परमार आणि राणा ईतवारी, गांधीबागमध्ये हवालाचा व्यवसाय करतात, तर संतोष चाळीसगाव (खान्देश) येथे हवाला चालवतो. या प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ केसवानी पसार आहे.
60 लाखांची मागितली खंडणी
सुपारी व्यापारी अनुप महेशचंद्र नगरीया याला 27 जानेवारी रोजी पोलिसांनी अटक केली होती. तो कारागृहात पोहोचल्यानंतर आरोपी मनोज वंजानी आणि अशोक वंजानी यांनी अनुपचे इंदोर (मध्यप्रदेश) निवासी मोठे बंधू अनिल यांना तुझा भाऊ कारागृहातून कधीच बाहेर येणार नाही. त्याला बाहेर काढायचे असेल तर वरीष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायपालिकेतील वरीष्ठांशी संधान साधावे लागेल, असे सांगून 60 लाखांची खंडणी मागितली. हे काम जळगावमधील सौरभ केसवानी हा करून देतो, अशी थाप मारली. सौरभचे व्हॉटसअॅप कॉलवर नगरीयासोबत बोलणे करून दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून नगरीया यांनी 30 जानेवारीला वंजानीच्या मेयो चौकातील वासन वाईन शॉपमध्ये 30 लाख रुपये आणून दिले. नंतर ते 30 लाख सौरभ केसवानीकडे पोहोचविण्यात आले.

पोलिस आयुक्तांना माहिती मिळताच कारवाई
अनुप नगरीयाला जामीन मिळाला अन् आरोपी त्याच्या व मोठ्या भावाच्या मागे उर्वरीत 30 लाख रुपये मिळावे म्हणून तगादा लावू लागले. नगरीया यांनी आपल्या व्यापारी मित्रांना हा प्रकार सांगितला. त्याची कुणकुण पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना लागली. अमितेशकुमार यांनी अनुप नगरीयाकडे चौकशी केली असता त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती देऊन सोमवारी तशी तक्रार नोंदवली. त्यावरून तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. वंजानी बंधूंनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथके चाळीसगाव, जळगाव, सूरतमध्ये पोहोचली. इकडे परमार आणि राणाला अटक करण्यात आलि तर तिकडे चाळीसगावमध्ये मानधनीयाला अटक करण्यात आली.
हवाला, दलालांमध्ये खळबळ
वरीष्ठ पोलीस अधिकार्यांशी सेटिंग करून देतो म्हणून शहरात फिरणारे अनेक दलाल आहेत. या दलालांपैकी बहुतांश दलाल हवाला, सुपारी तसेच गैरकाम करणार्या मंडळींशी संबंधित आहेत. वरीरष्ठ पोलीस अधिकार्यांच्या दालनात बसून त्यांच्या नावाने ‘सुपारी’ घेण्यात ही मंडळी सराईत असल्याचे बोलले जात आहे.
