रानडुकराच्या हल्ल्यात लालगोटा गावातील दुचाकीस्वार गंभीर जखमी
मुक्ताईनगर : लालगोटा येथील मोहनचंद विजानन पवार (21) व विलास वीरेंद्र पवार (वय 15) हे दोघे उमर्यात यात्रोत्सवात गेले होते. मंगळवारी रात्री 11 वाजता ते दोघे मोटारसायकलने घराकडे निघाले. उमरा ते लालगोटा जाणार्या जुन्या रस्त्यावर रानटी डुकराने त्यांच्या मोटारसायकलला जोरात धडक दिल्याने दुचाकी खाली पडताच रानडुकराने हल्ला चढवला. त्यात दोघे तरुण गंभीर जखमी झाले.
दोघे तरुण गंभीर जखमी
विलास पवार या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या नाकाला सुद्धा गंभीर जखम झाली तर मोहनचंद पवार याचा हात मोडला गेला. जखमी मोहनचंद याने त्याच्या वडीलांना फोन करून घडलेली घटना सांगितली. त्या दोघांना पहाटे साडेतीनच्या सुमारास जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.


