पिळोदा बुद्रुक गावातून बैलजोडी लंपास


यावल : तालुक्यातील पिळोदा बुद्रुक गावातून 50 हजार रुपये किंमतीची बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पिळोदा येथील शेतकरी ज्ञानेश्वर नामदेव सोनवणे यांची 50 हजार रुपये किंमतीची लाल पांढरी ठिपके असलेली बैल जोडी सोमवारी रात्री त्यांनी गावाबाहेर खळ्यात बांधली असताना चोरट्यांनी लांबवली. मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला. फैजपूर पोलिसात ज्ञानेश्वर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश चौधरी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !