निमझरी शिवारात 30 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून
अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा : घटनास्थळी शहर पोलीस अधिकार्यांसह श्वान व फॉरेन्सिक पथकाची धाव
Shirpur Murder शिरपूर : तालुक्यातील निमझरी शिवारात 30 वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी उघडकीस आली. संजय भोंग्या पावरा (30, रा.सामार्यापाडा, ता.शिरपूर) (Sanjay Bhongya Pavara) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. खून (murder) झालेला युवक हा शिरपूरमध्ये (shirpur) हॉटेलात कामाला असल्याची माहिती समोर आली आहे.
रस्त्यात हल्ला चढवत डोक्यात टाकले दगड
रात्री कामावरून घरी येतांना तालुक्यातील निमझरी ते सामर्यापाडा रस्त्यावर अज्ञात संशयितानी संजय पावरा (Sanjay Pavara) याला अडवून झटापटी करत रस्त्यापासून 30/40 फूट फरफटत घेऊन जात रस्त्यालगत असलेल्या लहान नाल्यात पडसाच्या झाडाखाली घेऊन जात संजय पावरा यांच्या डोक्यात तीन चार दगड टाकल्याने त्यात अति रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती सकाळी निमझरी गावाच्या पोलीस पाटील जयवंताबाई भिल यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली. मिळालेल्या माहितीवरून शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख (shirpur taluka pi ravindra deshmukh), सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश फड, महिला उपनिरीक्षक छाया पाटील यांनी पथकासह धाव घेत पाहणी करून तपासाबाबत मार्गदर्शन केले.


