कोळवदच्या इसमाची गळफास घेत आत्महत्या
यावल : तालुक्यातील कोळवद येथील 54 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मानसिंग उदयसिंग पाटील असे मृताचे नाव आहे. यावल पोलिसात हिरालाल शामराव पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मानसिंग उदयसिंग पाटील (54, रा.कोळवद) हे गुरूवारी रात्री आपल्या घरात झोपल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी शुक्रवारी सात वाजता कुटुंबीयांना पाटील यांनी फाशी घेतल्याचे लक्षात आले. यावल पोलिसांना माहिती कळविण्यात आल्यानंतर यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलवण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.डी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. मयत पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, मुलगी असा परीवार आहे. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, हवालदार सिकंदर तडवी, महेबुब तडवी करीत आहेत.
