मुक्ताईनगर तहसीलदारांच्या स्वाक्षरीने बनावट रेशनकार्ड : दोघांविरोधात गुन्हा


मुक्ताईनगर : तालुक्यातील चिखली येथील स्वस्त धान्य दुकानदाराने तहसीलदारांचे बनावट सही शिक्याने रेशनकार्ड दिल्याचे निष्पन्न झाल्याने दुकानदार व त्याच्या मुलाविरूद्ध पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दुकानदारासह मुलाविरोधात गुन्हा
चिखली येथील स्वस्त धान्य दुकानदार अजाबराव सीताराम पाटील व त्यांचा मुलगा पांडुरंग अजाबराव पाटील यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये प्रकाश शांताराम साहानी याला दोन हजार रुपये घेत तहसीलदार यांचे स्वाक्षरी व शिक्याचे बनावट रेशनकार्ड दिले होते. या विषयी तहसील कार्यालयात तक्रार आल्याने तपासात ते रेशनकार्ड बनावट व साहानी हा उत्तरप्रदेशातील मूळ रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पुरवठा विभागातील लिपीक प्रदीप आडे यांच्या फिर्यादीवरुन अजाबराव पाटील व पांडुरंग पाटील यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !