भुसावळातील अंजाळेकर परीवारातर्फे भागवत सप्ताहाचे आयोजन
भुसावळ : शहरातील साने गुरूजी नगर भागात नुकतेच भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्योतिषाचार्य ह.भ.प.भागवत महाराज देशमुख यांनी कथेचे निरुपण केले. शहरातील राजेंद्र अंजाळेकर तसेच आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे भुसावळ तालुकाध्यक्ष मयूर राजेंद्र अंजाळेकर यांच्यातर्फे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी अंजाळेकर कुटुंबियांतर्फे हभप भागवत महाराज यांचा सन्मान करण्यात आला. सप्ताहात गायनाचार्य ह.भ.प.पंकज महाराज, ह.भ.प.नितीन महाराज, ह.भ.प.दीपक होते. भागवत सप्ताहाचे नियोजन ह.भ.प..दिनेश महाराज (कंडारी) व साने गुरूजी नगर वासीयांनी केले.


