जमिनीच्या वादातून चुलत भावाने केला खून : आरोपी जाळ्यात

शिरपूर तालुक्यातील गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश


शिरपूर : शिरपूर तालुक्यातील खुनाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. जमिनीच्या वादातून हा खून चुलत भावाने केल्याचे निष्पन्न झाले आहे. शिरपूर तालुक्यातील निमझरी ते सामर्‍यापाडा गावाच्या दरम्यान 15 फेब्रुवारीला मध्यरात्री संजय बोंगर्‍या पावरा (वय 30) या तरुणाचा दगडाने ठेचून खून झाला होता. हा खून चुलत भाऊ दरबार कुमारसिंग पावरा (वय 26) याने केल्याचे निष्पन्न झाले आहे.

जमिनीच्या वादातून खून
मृत संजय भोग्या पावरा याच्या वडिलांना संशयीत आरोपी दरबार कुमारसिंग पावरा याने 15 हजार रुपये उसनवार दिले होते. हे पैसे परत मिळवण्यासाठी दरबारने मृत संजय आणि त्याच्या वडिलांकडे तगादा लावला होता. त्यातून वर्षभरापूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हापासून तिघांमध्ये धुसफुस सुरू होती. पैसे मिळत नसल्याने दरबारने मृत संजयच्या वडिलांची जमीन गहाण ठेवली होती.

यांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा
ही कामगिरी पोलीस अधिक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख, सहा.निरीक्षक गणेश फड, महिला कर्मचारी सी.बी.पाटील, एस.पी.मुरकुटे, ललित पाटील, रुपेश गांगुर्डे, तुकाराम गवळी, विनोद अखडमल, प्रवीण गोसावी, गोविंद कोळी, मुकेश पावरा, मनोज दाभाडे, अनिल अहिरे, प्रशांत पवार, सुरेश महाले, रोशनी पाटील यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !