चिनावल परीसरात शेती माल चोरट्यांची कदापी गय केली जाणार नाही : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे
सावदा : पोलिसांनी चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यासह अपप्रवृत्ती असलेल्या लोकांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केली तर शेती माल चोरट्यांची कदापी गय केली जाणार नाही, असे ठोस आश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी येथे दिले. वाढत्या शेती माल चोरीसह नुकसानीच्या पार्श्वभूमीवर चिनावलमधील लोकप्रतिनिधी, पोलिस प्रशासन व शेतकरी यांच्या संयुक्त बैठकीत मंगळवारी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार राजू भोळे, आमदार शिरीष चौधरी, सुरेश धनके, पंकज नारखेडे, राजन लासुरकर, राजेश वानखेडे, रमेश पाटील, पंकज येवले, गोपाळ नेमाडे, धनंजय चौधरी, चंद्रकांत भंगाळे, चिमण धांडे, मिलिंद वायकोळे, चिमण धांडे, रमेश महाजन, पंकज राणे, पिंटू राणे, गोपाळ पाटील, सोनजी नेमाडे, चिनावल पोलिस पाटील निलेश नेमाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश बोरोले, बापू पाटील, चंद्रकांत भंगाळे, ठकसेन पाटील, घनश्याम बोंडे, भरत बोंडे, किरण नेमाडे, किशोर बोरोले, नारायण नेमाडे, सागर भारंबे, जितेंद्र वानखेडे, संदीप महाजन, गोंडू महाजन व परीसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या पोलिस अधिकार्यांची उपस्थिती
जिल्हा पोलिस प्रशासनाकडून जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी कृणाल सोनवणे, सहा.निरीक्षक देविदास इंगोले, फैजपूरचे सहा.निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, निंभोर्याचे सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड आदींची उपस्थिती होती.
भंगार खरेदी करणार्यांची व्हावी चौकशी
खडसे म्हणाले की, विजेच्या तारा चोरणे, स्टार्टर फोडणे, वीज पंप फोडणे, फ्युज फोडणे आदी प्रकार वाढल्याने चोरट्यांचा बंदोबस्त गरजेचा असू शेती साहित्याची भंगारात खरेदी करणार्यांची देखील या प्रकरणात प्रशासनाने चौकशी करावी, असेही ते म्हणाले.
आमदार शिरीष चौधरी यांनी सावदा पोलिस प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. सावदा पोलिस स्टेशनमध्ये शेतकर्यांच्या तक्रारीचे निवारण केले जात नसल्याने प्रभारी पोलीस अधिकार्यांची बदली करावी, असे आमदार राजू भोळे म्हणाले.
यावेळी शेतकर्यांच्या वतीने प्रास्ताविक पंकज नारखेडे यांनी मांडले. चंद्रकांत भंगाळे, घनश्याम बोंडे यांनी ही शेतकर्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली. सूत्रसंचालन एम.एस.महाजन यांनी तर आभार बाजार समितीचे सभापती गोपाळ नेमाडे यांनी मानले.


