अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आक्रमक मात्र नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार !


मुंबई : राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर खोटे आरोप भाजपाकडून राजीनाम्याची मागणी केली जात असून खोटे-नाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (JAYANT PATIL) यांनी ठणकावून सांगितले आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून होत असल्याने त्यात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

विरोधकांनी यावे चहा-पाण्याला
विरोधकांना चहा-पाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल पण ते नेहमीप्रमाणे चहा-पाण्याला येणार नाहीत मात्र विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात, असे आवाहनही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विरोधकांना यावेळी केले.



कारवाईला विरोध केल्याने मलिकांवर कारवाई
शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले हे एसआयटीच्या रीपोर्टनुसार आलेल्या माहितीवरुन स्पष्ट होते. नवाब मलिक (Nawab Malik) हे याच कारवाईचा विरोध करत होते मात्र त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली असेही जयंत पाटील म्हणाले.

अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची तयारी
या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे, असेही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्ष पद निवडीबाबत सगळे एकत्र येऊन निर्णय घेतील. विरोधकांनी चहापान कार्यक्रमाला यावं अशी माझी विनंती आहे. त्यानिमत्ताने साधक बाधक चर्चा होईल, असेही पाटील म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !