सत्ताधार्‍यांच्या राजीनाम्याची मागणीसह घोषणाबाजीनंतर अभिभाषण न करताच राज्यपालांनी सोडले सभागृह


मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला गुरुवारी सुरूवात झाल्यानंतर सत्ताधार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या वक्तव्यावरून आक्रमक पवित्रा घेत सभागृहात घोषणाबाजी करीत राज्यपालांनी राजीनाम्याची मागणी केली तर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या घोषणाबाजीमुळे संबोधित करणे कठीण झाल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संबोधन आटोपते घेत सभागृह सोडले.

संघर्ष पोहोचला शिगेला
राज्यपालांनी माफी मागावी यासाठी सत्ताधारी सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केल्याने भगतसिंह कोश्यारी हे अभिभाषण न करता विधानसभेतून निघून गेले. यातून राज्यपाल आणि महाविकास आघाडीतील संघर्ष शिगेला पोहचल्याचे दिसून येत आहे.



मलिकांच्या राजीनाम्यावरून भाजपही संतप्त
आज नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून भाजप आक्रमक होणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते. या अनुषंगाने भाजपच्या सदस्यांनी आज विधी मंडळाच्या पायर्‍यांवर जोरदार आंदोलन केले तर सकाळी 11 वाजता सभागृह सुरू झाल्यावर नियमानुसार राज्यपाल अभिभाषण करण्यासाठी उभे राहिले. याप्रसंगी मविआच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करून राज्यपालांनी शिवरायांवरून केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी मागणी केली. याप्रसंगी जोरदार गदारोळ उडाला. यामुळे राज्यपाल अभिभाषण न करता अगदी राष्ट्रगीतालाही न थांबता भगतसिंह कोश्यारी हे सभागृहातून निघून गेले.

महाविकास आघाडी सदस्यांची जोरदार घोषणाबाजी
यानंतर महाविकास आघाडीच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करून राज्यपालांचा निषेध केला. याप्रसंगी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी राज्यपालांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करून घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहाच्या पहिल्या दिवशीच मविआने राज्यपालांना लक्ष्य केल्याचे दिसून आले. याप्रसंगी एका आमदाराने चक्क शीर्षासन करून राज्यपालांचा निषेध केला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !