भुसावळात बारावी परीक्षेला पहिल्याच दिवशी 36 विद्यार्थ्यांची दांडी
भुसावळ : बारावी परीक्षेला शहरात शुक्रवार, 4 मार्चपासून कडेकोट बंदोबस्तात सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरास 36 विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून एस.टी.चा संप सुरू असल्याने मर्यादीत साधने असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरासह ग्रामीण भाागातील 18 केद्रावर परीक्षा सुरू झाल्या आहे.
तासभर आधीच विद्यार्थी आले परीक्षा केंद्रावर
परीक्षा केंद्रावर शाळेतर्फे परीक्षार्थीचे थर्मल स्कॅनिंग करण्यात आल तसेच सॅटेटायझर हातावर टाकल्यानंतर प्रवेश देण्यात आला तसेच परीक्षार्थींना 10.20 वाजता प्रश्नपत्रिका देण्यात आली तर दहा मिनिटे प्रश्न पत्रिका वाचण्यासाठी विशेष वेळ यंदा देण्यात आला तसेच 10.30 वाजता विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका देण्यात आली. जळगाव येथील निरंतर शिक्षणाधिकारी यांच्या पथकाने शहरातील डी.एल.हिंदी हायस्कूल व वरणगाव येथील महात्मा गांधी हायस्कूलला भेट दिली. शहरासह तालुक्यात बारावीच्या परीक्षेसाठी सात मुख्य व 11 उपकेंद्र असे एकूण 18 केंद्र आहे.
शहरी भागात 36 परीक्षार्थींची दांडी
इंग्रजीच्या पहिल्या पेपरला शहरातील परीक्षा केंद्रावर तीन हजार 294 परीक्षार्थीची बैठक व्यवस्था करण्यात आली तर तीन हजार 258 विद्यार्थी परीक्षेला हजर होते तर पहिल्याच पेपरला शहरातील विविध केंद्रावर 36 परीक्षार्थी अनुपस्थित राहिले. विविध परीक्षा केंद्रावर 11 दिव्यांग परीक्षार्थींनी इंग्रजीचा पेपर दिल्यानंतर त्यांना एक तास यांना वेळ वाढवून देण्यात आली. दरम्यान, ग्रामीण भागात एकूण 977 पैकी 965 परीक्षार्थी पेपरला आलेतर 12 जणांनी पहिल्याच पेपरला दांडी मारली.


