साडेचार कोटींची हवाला रक्कम जप्त : तिघे जाळ्यात
नागपूर : नागपूरमध्ये पोलिसांनी हवालाच्या माध्यमातून आलेली सुमारे साडेचार कोटींची रोकड जप्त करण्यात आल्याने हवाला व्यावसायीकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्याच्या कोतवाली महलमध्ये ही कारवाई करण्यात आली. नेहाल सुरेश वडालिया (38, रा.कोतवाली), वर्धमान विलासभाई पच्चीकार (45) आणि शिवकुमार हरिशचंद दिवानीवाल (52, दोघेही रा.गोंदिया) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
नागपूर परीमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अपार्टमेंटमध्ये छापा टाकून तीन हवाला व्यावसायीकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार कोटी 20 लाखांची रोकड जप्त केली. या कारवाईमुळे शहरातील हवाला व्यावसायीकांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली.

