भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे महिलांचा सन्मान
Bhusawal Sports And Ranars Association भुसावळ : जागतिक महिला दिनानिमित्त भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे रनिंग व विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. डॉ.सुवर्णा गाडेकर सोनार म्हणाल्या की, प्रत्येक महिलेने सर्वप्रथम स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यायला हवे. संसार व नोकरी-व्यवसायानिमित्त बर्याच महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करतात परंतु नंतर त्यामुळे मोठे नुकसान होते. ते टाळण्यासाठी प्रत्येक महिलेने नियमित व्यायाम करावा असा सल्ला देखील त्यांनी दिला. अध्यक्षस्थानी डॉ.नीलिमा नेहेते होत्या. यावेळी डॉ.चारुलता पाटील यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली व वक्त्यांचा पपरीचय दिला तर महिलांचा प्रसंगी सन्मान करण्यात आला.
महिलांचा गुलाबपुष्प देवून सन्मान
आजच्या महिला सन्मान रनचे महत्त्व म्हणजे पती-पत्नी, भाऊ-बहीण, वडील- मुलगी, आई- मुलगी सोबत जोडीने धावले. चार किलोमीटर धावण्याचे अंतर पूर्ण केल्यानंतर सर्व धावपटू पुन्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर परत आल्यानंतर त्यांचा त्यांच्या घरातील पुरुष सदस्याकडून गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी तर आभार प्रिया पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी रणजीत खरारे, ब्रिजेश लाहोटी, अखिलेश कनोजिया, विजय मोहनानी, प्रकाश आटवानी, कैलास छाब्रा, अंकित पोद्दार, रामचंद्र झोपे यांचे सहकार्य लाभले.


