मुक्ताईनगरात स्त्री शक्तीचा सन्मान
मुक्ताईनगर : मुक्ताईनगरात जागतिक महिला दिनानिमित्त तहसील आवारात पोलिस, महसूल विभागासह विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या समस्त महिला भगिनींचा सन्मान करण्यात आला.
यांचा झाला सन्मान
तहसीलदार श्वेता संचेती, महसूल विभागातील उज्वला सोनार, उपनिरीक्षक परवीन तडवी, रुपाली डांगे, नर्मदा चव्हाण, शारदा पाटील, रजनी तायडे, सिद्धी निघोट, प्रेरणा निबेकर, अंकिता गवळी, स्वरुपा पांडे, भाग्यश्री पाटील, लक्ष्मी इंगळे आदी महिलांचा सत्कार करण्यात आला. मराठा सेवा संघाचे जिल्हा प्रचारक दिनेश कदम, मणियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकिम चौधरी, साहित्यीक डॉ.अ.फ.भालेराव, माजी पोलीस पाटील मोहन कौतीक मेढे, वंजारी समाजाचे जिल्हाध्यक्ष कैलास वंजारी आदी उपस्थित होते.


