भुसावळात महाआरोग्य शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भुसावळ : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी भव्य महा आरोग्य शिबिर मंगळवार, 8 रोजी घेण्यात आले. प्रभाग क्रमांक चारच्या नगरसेविका दीपाली परीक्षीत बर्हाटे व डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटन रजनी संजय सावकारे, दीपाली परीक्षित बर्हाटे, डॉ.सुवर्णा गाडेकर, आरती चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले.
विविध आजारांची तपासणी
शिबिरामध्ये अस्थिरोग तपासणी, डोळ्याची तपासणी, हृदयरोग तपासणी, स्त्री रोग तपासणी, कान नाक ,घसा तपासणी, 2 डी इको, इसीजी, रक्त तपासणी करण्यात आली. शिबिरात मोफत आठ दिवसांची औषधी देण्यात आली. भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, शैलजा पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, रमाशंकर दुबे, अनिता आंबेकर, भारती वैष्णव, धनश्री टोके, वैशाली चौधरी, अंजली चौधरी, जयश्री चौधरी, डिंपल चौधरी, वर्षा पाटील, मनीषा पाटील, कविता जावळे, हेमांगिनी चौधरी, आशा ठोंबरे, निलकमल भोळे, सुनीता धांडे, मीनाक्षी धांडे, ममता फालक, दीपाली सरोदे आदी महिलांची उपस्थिती होती. सुमारे पाचशेवर महिलांनी उपस्थिती दिली तर अडीचशेवर महिलांवर उपचार करण्यात आले.


