अपघातातील बेशुध्द इसमावर डॉ.योगीता पाटील यांचे केला तत्काळ उपचार


रावेर : सोमवारी रात्रीच्या सुमारास बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने तुळशीराम सुभाष सावळे (रा.कर्जोत) हे बेशुध्द पडले होते. यावेळी डॉ.योगीता पाटील व डॉ.संदीप पाटील आपल्या खाजगी वाहनाने रावेरच्या दिशेने येत असताना त्यांनी तातडीने देवदूत बनून सावळे यांची मदत केली.

डॉक्टर ठरल्या ‘देवदूत’
रात्रीच्या अंधारात मोबाईलच्या उजेडात त्यांनी वाहनात असलेल्या प्रथमोपचार पेटीतून जखमी इसमावर उपचार केल्याने ते शुद्धीवर आले व त्यांनी घडलेला घटनाक्रम सांगत डॉक्टरांचे आभार मानले. डॉ.संदीप पाटील यांनी रावेर पोलिस ठाण्याला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली तसेच जखमी इसमाला रावेर ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारार्थ हलवले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !