घोडसगावात मुलीने केले वडिलांवर अंत्यसंस्कार


मुक्ताईनगर : तालुक्यातील घोडसगाव येथील संतोष विठोबा धायडे यांचे वयाच्या 70 व्या वर्षी बुधवारी निधन झाले. निधनानंतर धायडे यांना मुलगा नसलातरी मुलगा-मुलगी एकसमान या तत्वाने धायडे यांच्या सातही मुलींनी पुढे येत अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले. मुलगी अर्चना लक्ष्मण महाजन (येवती), लता शरद वनारे (मलकापूर), मंगला अनिल ऊदेकर (अनुराबाद), संगीता गजानन डोळस (मनुर बु.॥), विद्या अनिल मोरे (फतेहपूर पिंप्री, सरीता कमलाकर जप्ते (लिहा), रीता श्रावण अवचारे (किन्ही, फतेहपूर) या सातही मुलींनी स्मशानभूमी गाठली. भारतीय संस्कृतीच्या रीतीरीवाजाप्रमाणे धाकटी मुलगी रीताने अंत्यविधी गायत्री परीवाराच्या विधीनुसार केला.

घोडसगावकरांनी केली लेकींचे कौतुक
मुलगा-मुलगी एकसमान हे तत्व देशभरात लागू आहे तर स्व.अटलबिहारी वाजपेयी, स्व.सुषमा स्वराज यांनादेखील त्यांच्या मुलींनी अग्निडाग दिल्याने घोडसगावच्या लेकींनीही पुढे येत पित्याला अग्निडाग देण्यासाठी स्मशानभूमी गाठली. तेराव्याचा कार्यक्रम हा गायत्री परीवाराच्या विधीनुसार घरघुती स्वरूपात करणार असल्याचे सांगण्यात आले. परंपरेच्या तुलनेने विवेकास महत्त्व देवून घोडसगावच्या धायडे परीवारातील लेकींनी समाजात आदर्श घडवून आणल्याने त्यांचेही कौतुक होत आहे. मुलींनी समाजात समानता दाखवून एक आदर्श पायंडा पाडल्याचे हे उदाहरण आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !