शंभर रुपये चोरल्याच्या आरोपातून युवकाचा खून
औरंगाबाद : पैसे चोरल्याच्या संशयातून युवकाचा खून करण्यात आला. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आनंदनगर येथे बुधवारी रात्री घडली. युवकाचा मारहाणीत मृत्यू झाल्यामुळे आरोपीने दुचाकीवर मृतदेह ठेवून कारगिल मैदानाजवळील कचर्यात पहाटे फेकल्याचा प्रकार उघड झाला. शेख अश्फाक ऊर्फ मुक्या शेख अब्दुल (18, रा. बंबाटनगर) असे मृताचे नाव असून संशयीत आरोपी शेख मुबारक ऊर्फ बाबा शेख हैदर (38, रा. आनंदनगर) या अटक करण्यात आली.