भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार
Road Accidant अक्कलकोट : कर्नाटकातील प्रसिध्द दत्त मंदिर गाणगापूर येथे दर्शन करून अक्कलकोटमार्गे अहमदनगरकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात होवून चार महिलांसह चालक जागीच ठार (the driver along with four women were killed on the spot) झाल्याची घटना शुक्रवार दुपारी तीन वाजता घडली. गाणगापूर रोडवर कर्नाटक हद्दीत बळुरगी गावाजवळ हा अपघात घडला. भरधाव चारचाकी नियंत्रण सुटून झाडावर आदळून हा अपघात घडला. अफझलपूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पाच जणांचा जागीच मृत्यू
या अपघातात बाबासाहेब सखाराम वीर, कोमल बाबासाहेब वीर, राणी बाबासाहेब वीर, अणव हिराबाई, छाया बाबासाहेब वीर यांचा जागीच मृत्यू झाला तर साहिली बाबासाहेब वीर, त्राली दिनकरा सुरवशी गंभीर जखमी झाले.




अपघातात केवळ दोघे बचावले
कारमधील पाच जण मृत्युमुखी पडले असून अन्य दोन बचावले असलेतरी त्यांची प्रकृती गंभीर आहे. अहमदनगरवरून नातेवाईक निघाले असून ते आल्यावरच रात्री उशिरा फिर्याद दाखल होईल, अशी माहिती अफझलपूरचे पीएसआय विश्वनाथ मुदरेड्डी यांनी दिली. सर्व प्रवाशी अहमदनगरचे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ते कर्नाटकातील प्रसिध्द दत्त मंदिर गाणगापूर (The famous Datta temple Gangapur in Karnataka) येथे दर्शन करून अक्कलकोट मार्गे अहमदनगरकडे जात होते.