फोन नंबर तो या है ना दोस्तो : सोनू सुदच्या या ट्विटच्या चांगलीच चर्चा


Sonu Sood Sister Malvika नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीत आपच्या झाडूने चांगलीच सफाई करीत भल्या-भल्यांना गारद केल्याने अरविंद केजरीवाल सुपर हिरो ठरले. बॉलिवडूचा अभिनेता सोनू सुद याची बहिण मालविका (sonu sood sister malvika) ही पंजाबच्या मोगा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे लढली मात्र आप पक्षाच्या उमेदवार अमनदीप कौर अरोरा यांनी तिचा सुमारे 20 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. या पराभवानंतर प्रथमच सोनू सुदने केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे.

‘फोन नंबर तो याद है ना दोस्तो’
बहिणीच्या पराभवानंतर सोनू सुद (Sonu Sood Sister Malvika) याने एक ट्टिव केले आहे. त्यात ‘मी आणि मालविका आम्ही आयुष्यभर तुमच्या सेवेसाठी तत्पर असू…,’असं त्याने या ट्विटमध्ये लिहिलं आहे. शिवाय या फोटोसोबत एक कविताही शेअर केली आहे.





‘खिलाफ कितने हैं ये जरूरी नहीं… साथ कितने हैं ये जरूरी है…मदद करने के लिए तो सिर्फ जज्बा चाहिए… जो कल भी था आज भी है और आगे भी रहेगा… फोन नंबर याद है ना दोस्तों…,’ असं यात लिहिलं आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !