समाजाला राजकीय, आर्थिकदृष्टया साक्षर करण्याची गरज
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे : फैजपूरात धनाजी नाना महाविद्यालयात द्वि-दिवसीय राष्ट्रीय परीसंवाद
फैजपूर : देशातील जनतेला पारंपरीक शिक्षणासोबतच आर्थिक आणि राजकीयदृष्टया साक्षर करण्याची गरज आहे, तसेच बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षणातील सर्व स्तरावरील विद्वानांना प्रामुख्याने शिक्षकांना एकत्रीत करून शैक्षणिक धोरण निश्चित केले पाहिजे आणि जे पदव्युत्तर स्तरावर शिकविले जाणार आहे त्याची जाणीव बालवाडीपासूनच विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून शिक्षणाची आखणी केली गेली पाहिजे, असे मत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी येथे व्यक्त केले. फैजपूरात महाराष्ट्र राज्य वाणिज्य परीषदेच्या राष्ट्रीय परीषदेत उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
फैजपूरात राष्ट्रीय परीसंवाद
धनाजी नाना महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य वाणिज्य परीषद मुंबई व धनाजी नाना महाविद्यालयाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना नंतरच्या काळातील वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रातील स्पर्धात्मक फायदे
या विषयावर ‘द्वि-दिवसीय राष्ट्रीय परीसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी परीषदेचे अध्यक्ष व आमदार शिरीष चौधरी म्हणाले की, बहुशाखीय शिक्षण धोरण अवलंबले गेले पाहिजे, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र्य दिले गेले पाहिजे, परंपरागत कला, वाणिज्य, विज्ञान असे शिक्षणाचे विभाजन केल्यामुळे न्यूनगंड निर्माण होतो म्हणून सार्वभौम सर्वंकष शिक्षण दिले गेले पाहिजे. प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी प्रास्ताविक केले.
या मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
महाराष्ट्र राज्य वाणिज्य परीषदेचे डॉ.बी.बी.तायवाडे, महाराष्ट्र राज्य वाणिज्य परीषदेचे सहसचिव डॉ.जी.वाय.शितोडे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ.माधवी कुलकर्णी यांना डॉ.पी.सी.शेजवलकर आणि कै.महादेवराव तल्हार आदर्श शिक्षक पुरस्कार व
प्रा.अशोक कोकाटे यांना सौरव शिवरे यांच्या स्मरणार्थ तरुण संशोधक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र वाणिज्य परीषदेच्या सहयोगी सदस्य म्हणून डॉ.अरविंद चौधरी, डॉ.माधवी कुलकर्णी, डॉ.एन.गुरव, डॉ.अजय भामरे, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.अरुण गायकवाड, डॉ.कुलदीप शर्मा, डॉ.शिवप्रसाद डोंगरे, डॉ.निशीकांत झा, डॉ.ममताबेन पाटील यांची निवड करण्यात आली.
पुरस्कारासाठी देणगी
आमदार शिरीष चौधरी यांच्यातर्फे
लोकसेवक स्व.मधुकरराव चौधरी जीवन गौरव पुरस्कारसाठी परीषदेला एक लाख रुपये देणगी देण्यात आली. डॉ.डी.एम.ललवाणी यांच्यातर्फे स्व.स्वप्नील ललवाणी, तरुण समाजसेवी संशोधक प्राध्यापक पुरस्कारासाठी 51 हजार रुपये देणगी देण्यात आली.
यांची प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, डॉ.जी.एम.तल्हार, डॉ.बी.बी.तायवाडे, डॉ.जी.वाय.शितोळे, डॉ.आर.के.टेलर, लिलाधर चौधरी, के.आर.चौधरी, मिलिंद वाघूळदे, एम.टी.फिरके, ओंकार सराफ, डॉ.एस.एस.पाटील, संजय चौधरी, प्रभात चौधरी, कुलदीप शर्मा, काँग्रेसचे युवा नेते धनंजय चौधरी, उपप्राचार्य व परीषदेचे समन्वयक डॉ.ए.आय.भंगाळे, डॉ.जी.जी.कोल्हे, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, प्राचार्या डॉ.पिंगला धांडे, डॉ.महेश जोशी, डॉ.जे के.शर्मा, डॉ.जयश्री सूर्यवंशी, डॉ.शिवप्रसाद डोंगरे, डॉ.डी.एम.खंडारे, डॉ.निषिकांत झा, प्रा.एस.जे.पाटील आदी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
यशस्वीतेसाठी डॉ.रवी केसूर, डॉ.निखील वायकोळे, डॉ. आरती भिडे, प्रा. सचिन भिडे व महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ.राजश्री नेमाडे, डॉ.आर.आर.राजपूत, डॉ.सीमा बारी यांनी तर आभार डॉ.बी.बी.तायवाडे यांनी मानले.


