गृहमंत्र्यांची मोठी घोषणा : 7 हजार 231 पदांसाठी पोलिस भरती होणार


मुंबई : पोलिस भरती होण्याचे स्वप्न पाहणार्‍या बेरोजगार युवकांसाठी ही दिलासादायक बाती आहे. राज्यात लवकरच पोलिसांची भरती प्रक्रिया होणार असून सात हजार 231 पदे भरण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील विधानसभेत दिली.

त्या भरतीनंतर आता केवळ नेमणूक बाकी : गृहमंत्री
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले तसेच फडणवीसांच्या स्टिंग ऑपरेशनबाात सीआयडी चौकशी करण्याबाबत वळसे पाटील यांनी घोषणा केली. दरम्यान वळसे पाटील यांनी सोशल मीडियातून सातत्यानं पोलिस भरती कधी करणार? असं विचारणा होत असल्याचं सांगितलं. या निमित्ताने मी 2019 रोजी रिक्त असलेल्या पोलिस शिपाईपदाच्या 5,297 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, याच्या नेमणुका देणं बाकी आहे. पण येत्या काही काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यानंतर दुसर्‍या टप्प्यात 7,231 पोलिसांची भरती करण्यात येईल. याला मंव्त्री मंडळानं मंजुरी दिली आहे, अशी घोषणा दिलीप वळसे पाटील यांनी दिली.



गैरप्रकार न होण्याची सरकार घेणार काळजी
पोलिस भरती करताना त्यात कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची काळजी आमच्याकडून घेण्यात येईल. यानंतर पुढील दोन वर्षात जी भरती होईल, त्याचा प्रस्तावही आम्ही मंत्री मंडळात मांडणार आहोत. त्यालाही मंजुरी मिळाली तर अनेक तरुणांना रोजगाराची संधी मिळेल असे पुढे वळसे पाटील म्हणाले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !