लालगोटा येथे गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर पोलिसांची कारवाई


मुक्ताईनगर : तालुक्यातील लालगोटा येथे गावठी हातभट्टीची दारुभट्टीवर पोलिसांनी छापा टाकून 200 लिटर कच्चे रसायन नष्ट केल्याने अवैध धंदे चालकांच्या गोटात खळबळ उडाली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
कुर्‍हा येथील पोलिस दूरक्षेत्राचे कॉन्स्टेबल गोपीचंद शेनफडू सोनवणे यांना लालगोटा शिवारात दिनेश बाबू पारधी यांच्या शेता नजीक नाल्याचा काठाजवळ गावठी हातभट्टीची दारू सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मुक्ताईनगर निरीक्षक राहुल खताळ यांना माहिती दिल्यानंतर सहाय्यक फौजदार सादिक पटवे, पोलिस कॉन्स्टेबल सागर सावे, गोपीचंद सोनवणे, राहुल नावकर यांनी लालगोटा शिवारात दिनेश बाबू पारधी यांच्या शेताजवळील नाल्याकाठी गावठी हातभट्टी सुरू असल्याचे दिसल्यानंतर सात हजार 500 रुपये किंमतीचे गुळमोह मिश्रित 150 लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले तसेच 10 लिटर तयार दारू मिळून 11 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बिरु शिलदार पवार (36, पावरी वाडा, धुळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई पोलिस निरीक्षक राहुल खताळ व पोलिस उपनिरीक्षक परवीन तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !