वरणगावातील प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रश्न मार्गी लावणार

भाजपा पदाधिकार्‍यांना जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांचे आश्वासन


 

वरणगाव : वरणगावातील प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी भाजपाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानंतर दिली.



भाजपा पदाधिकार्‍यांचे निवेदन
शहरातील सिद्धेश्वर नगरातील अतिक्रमण नावावर करून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत वरणगावसाठी 300 घरे मंजूर झाली आहेत मात्र सिद्धेश्वर नगरातील जास्त घरे मंजूर असून निधीही येऊन पडला आहे मात्र सिद्धेश्वर नगरातील जागेवर घरे बांधण्यासाठीची जागा ही सरकारची असल्याने त्या जागेवर घरे बांधण्यासाठी जागा मोजणी फी भरणे आवश्यक आहे. नगरपरीषदेची आर्थिक परीस्थिती प्रतिकुल असल्याचा दावा मुख्याधिकार्‍यांनी केला असून फी मध्ये 50 टक्के माफी द्यावी तसेच प्रधान मंत्री आवास योजनेची घरे बांधण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, डॉ.नाना चांदणे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, भाजयुमोचे शहराध्यक्ष आकाश निमकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे नुकतीच केली. जिल्हाधिकार्‍यांनी याबाबत सकारात्मक दखल घेण्याचे आश्वासन यावेळी दिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !